सदाशिनगर – बाजार तळ ते पालखी मुक्काम ठिकाणा पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करावे व पथदिवे बसवावेत अशी मागणी महिला वर्गातून होण आहे .
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शहराबाहेर मुक्कामाला असतो .शहरासह अनेक खेड्यातील नागरिक दर्शनासाठी येत असतात .बाजार तळ ते मुक्काम ठिकाणाचा रस्ता अपुरा असून या रस्त्यावर दोन्ही बाजूने पालखी सोहळ्यातील व्यापारी बसल्याने या रस्त्यावरून दर्शनासाठी जाण्या येण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो .वास्तविक पाहता बाजार तळापासून मुक्काम ठिकाणी जाण्याऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस मोकळी जागा असून यापूर्वी याजागेत नगर पंचायत आपला कचरा टाकत होती परंतु नगर पंचायतीने दुसरी जागा घेतल्याने याठिकाणी आता कचरा टाकला जात नाही .त्यामुळे हि जागा मोकळी आहे .या मोकळ्या जागेत रस्त्याचे रुंदीकरण केल्यास रस्ता मोठा होणार आहे.त्यामुळे पालखी मुक्कामाच्या वेळी दोन्ही बाजूस व्यापाऱ्यांनी दुकाने टाकली तरी मध्ये मोठा रस्ता राहणार आहे .त्यामुळे महिलांना दर्शनासाठी जाण्यायेण्यासाठी अडचण भासणार नाही .अरुंद रस्त्याचा फायदा घेत रोड रोमिओ त्याठिकाणी उभा राहून ढकला ढकली करतात .महिलांना जाता येता त्याचा त्रास सहन करावा लागतो .यासाठी बाजार तळ ते पालखी मुक्काम ठिकाण पर्यंतचा रस्ता रुंद करावा अशी मागणी होत असून या रस्त्यावर पथदिवे बसवावेत अशी मागणी विशेषता महिला वर्गातून होत आहे.
गतवर्षी तत्कालीन नगराध्यक्ष विजय देशमुख यांनी याठिकाणी दोन मर्क्युरी टोवर उभारून प्रकाशाची व्यवस्था केली होती.
रस्ता रुंद झाल्यास माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सोयीचे होणार आहे.अरुंद रस्त्यामुळे या ठिकाणी गर्दी होते.महिलाना जात येता नाहक त्रास सहन करावा लागतो.
नंदा पंचवाघ,नागरिक माळशिरस
या ठिकाणी मुरूम टाकून सपाटीकरण करणेसाठी पाठपुरावा करून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ
सुमित जाधव मुख्याधिकारी,नगर पंचायत माळशिरस




















