Saturday, June 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत विरेश शरणार्थी व मानस गायकवाड यांचे उल्लेखनीय यश

तरुण भारतbyतरुण भारत
May 10, 2026
in editor
0
आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत विरेश शरणार्थी व मानस गायकवाड यांचे उल्लेखनीय यश
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – मुंबई, पुणे, अहमदाबाद व सांगली येथे आयोजित विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धांमध्ये फिडे मास्टर विरेश शरणार्थी व आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये विरेशने नेत्रदीपक खेळ करत एकूण रु. १ लाख ५३ हजारांची रोख पारितोषिके व आकर्षक चषक पटकावले तर मानसनेही सातत्यपूर्ण व चमकदार खेळाच्या जोरावर रु. १ लाख २९ हजारांची रोख पारितोषिके व आकर्षक चषक आपल्या नावावर केले.

मुंबई येथे काल संपन्न झालेल्या रमाबाई रानडे फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या वीरेशने आपल्या बुद्धीचातुर्य व तांत्रिक कौशल्याच्या बळावर आंतरराष्ट्रीय मास्टरसह अनेक नामांकित खेळाडूंवर मात केली. अकरा पैकी दहा गुणांची कमाई करत त्याने स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखत विजेतेपद पटकावले. यासाठी त्याला रु. ५० हजारांचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला.

तसेच अहमदाबाद येथे झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत वीरेशने पाचवा क्रमांक मिळवत रु. ३८ हजारांचे पारितोषिक पटकावले. याच ठिकाणी झालेल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक मिळवत रु. ३० हजारांचे पारितोषिक मिळविले. आरसीपीपी ब्लिट्झ रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेतही वीरेशने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत पश्चिम बंगालच्या आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजीत पॉल याचा पराभव केला. नऊ पैकी आठ गुण मिळवत त्याने विजेतेपदासह रु. २० हजारांचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक पटकावला.

पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या चेस मॉन्क सीझन-१ स्पर्धेत मानस गायकवाड याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अतिशय चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत नऊ पैकी सात गुणांची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने विजेतेपद पटकावत रु. ७० हजारांचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक मिळविला.

तसेच पुण्यातील ब्लिट्झ व रॅपिड स्पर्धेत मानसने सहावा क्रमांक मिळवत रु. ६ हजारांचे पारितोषिक पटकावले. ब्लिट्झ स्पर्धेत उपविजेतेपद मिळवत रु. १० हजारांचे पारितोषिक मिळविले. सांगली येथील सुरज आंतरराष्ट्रीय गुणांकन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांकासह रु. १० हजारांचे पारितोषिक मिळविले. तसेच लाटे रॅपिड आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत सात पैकी सात गुणांची परिपूर्ण कमाई करत सरस बुचोल्झ गुणपद्धतीच्या आधारे विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले व रु. १२ हजारांचे रोख पारितोषिक पटकावले. अहमदाबाद येथील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेतही त्याने पाचवा क्रमांक मिळवत रु. २१ हजारांचे रोख पारितोषिक जिंकले. या स्पर्धेत विविध राज्यातील ९८७ मातब्बर खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

विरेश व मानसला आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, उदय वगरे तसेच  भारतीय बुद्धिबळ महासंघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, चोला चेस यांचे मार्गदर्शन लाभत आहे.  खेळाडूंनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष खा. धैर्यशील मोहिते पाटील, सोलापुर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, अतुल कुलकर्णी, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड, संतोष पाटील, सौ. दिपाली पुजारी आदींनी अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र चेस असोसिएशनचे आधारस्तंभ अशोक भाऊ जैन, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष परिणय फुके व सचिव निरंजन गोडबोले यांनी देखील कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

Post Views: 35
Previous Post

एस.एस.सी.बोर्ड परिक्षेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या प्रित्यर्थ वटवृक्ष मंदीरात सत्कार

Next Post

ध्येयाने झपाटलेल्या आईने दृष्टीहिन लेकीसाठी रात्रंदिवस केले कष्ट ; लेकीने मिळवले ८२ टक्के गुण 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ध्येयाने झपाटलेल्या आईने दृष्टीहिन लेकीसाठी रात्रंदिवस केले कष्ट ; लेकीने मिळवले ८२ टक्के गुण 

ध्येयाने झपाटलेल्या आईने दृष्टीहिन लेकीसाठी रात्रंदिवस केले कष्ट ; लेकीने मिळवले ८२ टक्के गुण 

ताज्या बातम्या

नाईट लँडिंगचे कारण नको विमानसेवा सुरळीत ठेवा – जिल्हाधिकारी #viral #news #solapurnews

June 27, 2026

म्हणून उडत नाहीये सोलापूरातून विमान….. #viral #news #solapurnews

June 27, 2026

केतनचे परिवार भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय

June 27, 2026

दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनाचा खर्च रु १४५ ११ कोटी #viral #news #solapurnews

June 27, 2026

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आत्मचिंतनाची गरज #news #marathinews

June 27, 2026

टी ई टी परीक्षेचा पेपर फुटला #viral #news #breakingnews

June 27, 2026

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींनी जे घडलं ते थेट सांगितले….. #viral #marathinews #news

June 27, 2026

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0942640

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697