सोलापूर – जगात जे कोणी करू शकत नाही ते केवळ आई करू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रभागा एलगुलवार शाळेत सर्वसामान्य वर्गात शिकणारी मात्र दृष्टीही असणारी कन्या रक्षिता हिची आई रेणुका शिंदे होय. या आईने आपल्या कन्येला सतत प्रेरणा देऊन जन्मतःच दृष्टीही नसणाऱ्या रक्षिताला दहावीत ८२ टक्के गुण प्राप्त करण्यासाठी मदत केली आहे. या यशाने रक्षिताच्या आईने आईच केवळ हे करू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
जन्मतःच अंध असणाऱ्या रक्षिताला दिसत नाही हे पाच-सहा महिन्यात समजले त्यानंतर त्यांनी प्रचंड दवाखाने केले मात्र कुठेही गेले तरी याला उपचार नाहीत हे समजले कारण तिची मुळातच डोळ्यांची जी नस आहे ती निकामी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले पदरी आलेले आपलं बाळ असं आहे हे समजल्यानंतर अनिता या खूप रडल्या अनेक वर्षा रडत होत्या. पण यातून काहीही साध्य होणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या याच कमकुवत पणाला सक्षमतेचा मार्ग म्हणून आपल्या मुलीला शिक्षण द्यायचे हे निश्चित केले त्यासाठीचा शोध सुरू झाला आणि लहानपणापासूनच चंद्रभागाबाई शाळेत प्रवेश घेतला. नेत्याने माप्रमाणे विशेष मुलांसाठी ब्रेल लिपीतून जे शिक्षण दिले जाते ते शिक्षण ती घ्यायला लागली. यासाठी शिक्षकांनी संस्थापक माजी आमदार प्रकाश यलगुलवार आणि सीमा यलगुलवार, शशी भूषण या सर्वांनी सुरुवातीपासूनच प्रचंड मदत केली. गरिबी असल्याने मुलीला कायम सकारात्मक दृष्टीने साथ दिली त्यातून ती प्रबळ इच्छा शक्तीने शिकायला लागली पण आई शिवाय कुठलीही गोष्ट शक्य नव्हती. शाळेत जे शिकवतात ते पुन्हा आल्यानंतर विचारणा करून तिला शिकवण तिच्याकडून करून घेणं स्वच्छता राखणं खाण्यापण्याच्या आवडीनिवडीं बरोबर देणं जे चांगलं आहे. त्याबद्दल सांगणं समाजात कसे वापरायचे कसे बसायचे कसे उठायचे याबद्दलचे विशेष प्रशिक्षण या सगळ्या गोष्टीतून सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे कसे जगायचे याचे प्रशिक्षण आईने लहानपणापासूनच दिलं यासाठी प्रचंड वेळ द्यावा लागत असते पण तो वेळ देण्याची तयारी आईने दाखवली आणि त्यानुसार तिचा प्रवास सुरू झाला. आता तो प्रवास दहावीच्या उत्तम गुण मिळवण्यापर्यंत येऊन पोहोचला असून पुढे तिला भरपूर शिक्षण घेण्याची इच्छा आहे.
रक्षिताला व्हायचे आहे शिक्षिका
रक्षिताच्या आई-वडिलांनी लहानपणापासूनच प्रचंड कष्ट केले आहेत. मात्र रक्षिताला दृष्टी नाही हे समजल्यानंतर आणखीनच संघर्षाची तयारी करावी लागली. पण हसत खेळत पालकत्व स्वीकारत वडील अनिल आणि आई रेणुका यांनी आपला मार्ग निवडला. वडिलांनी आणि आईने आपल्याला प्रचंड कष्टाने वाढवले आहे आपल्याला हवे ते दिले आहे आपले दोन्ही डोळे झाले त्या आई-वडिलांना आपण मोठे होऊन दाखवायचे स्वप्न रक्षिताला उरी बाळगायचे आहे ती आपल्याला शिक्षिका व्हायचे आहे हे ठामपणे सांगत होती.
आई नसती तर मी काहीच करू शकले नसते
मदर्स डे निमित्त रक्षिताला आई बद्दल तुझ्या भावना काय आहेत हे विचारले असता डोळे गच्च भरून आलेली रक्षिता मिळाली आई नसती तर मी काहीच नसते आज इथपर्यंतचा प्रवास शक्यच नसता असे सांगितले. या उत्तराने हळवी झालेली रक्षिता आणि आई दोघींनीही एकमेकींना घट्ट मिठी मारली आणि पुन्हा हसत पुढच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुरुवात केली.
रक्षिता शिंदे – चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला विद्यार्थीनी


























