वेळापूर – शिवम मेडिकल, वेळापूर येथे पिसेवाडी गावचे सुपुत्र गणेश संगीता ज्ञानेश्वर वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत पोलीस खात्याअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करून सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
रजनीश बनसोडे म्हणाले :
“ग्रामीण भागातून कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर गणेश वाघ यांनी पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड होऊन वेळापूर परिसराचा मान उंचावला आहे. त्यांचे हे यश युवकांसाठी प्रेरणादायी असून भविष्यातही त्यांनी प्रामाणिक सेवेतून समाजाचे नाव उज्ज्वल करावे,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मिलिंद सरतापे म्हणाले :
“गणेश वाघ यांचे यश हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी त्यांचा प्रवास आदर्शवत असून मेहनत, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या प्रसंगी वेळापूर गावचे सरपंच रजनीश बनसोडे, रिपाई आठवले तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे साहिल आतार कार्याध्यक्ष ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, माळशिरस तालुका), डॉ. धनंजय म्हेत्रे, दूधगंगा डेअरीचे चेअरमन भागवत गायकवाड, रणजीत सरवदे, ज्ञानेश्वर वाघ ,महाराष्ट्र पोलीस प्रकाश साठे,डॉ. मिलिंद पवार, डॉ. सागर बनसोडे, आतिक तांबोळी, संदीप म्हेत्रे, संतोष म्हेत्रे, आकाश म्हेत्रे, कल्याण भानवसे, सुधिर पिसे,विठठल वाघे,अभिजीत गवळी, आर्यन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

























