पंढरपूर – येथील दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलितविवेक वर्धिनी विद्यालयात दहावी परीक्षे मध्ये यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचासंस्था व प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावर्षीचा दहावी परीक्षेचा सरासरीनिकाल ८८.८८ टक्के इतका लागला आहे.
प्रशाले मध्ये गायत्री भागवत बडवे ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमाकांनेउत्तीर्ण झाली आहे. शिवप्रसाद उमेश देवमारे याने ९६.६० टक्के व्दितीय क्रमांक प्राप्तकेला आहे. तनिष्का सतिश गाडेकर हिने ९४.२० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक मिळविलाआहे. या शिवाय ओम शेषनारायण माने याने ९२.४० टक्के, समीक्षा राहुल काटे ९१ टक्के, समृध्दीनितीन कचरे ९०.६० आणि स्वरुप संतोष बारसकर याने ८९.८० गुण प्राप्त केले आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार प्राचार्ययु.आर.मुंढे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डाँ.मुंढे म्हणाले की प्रशालेत केलेल्याविविध सुविधा व विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच शाळेची उज्वल यशाची परंपरा टिकूनआहे. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी प्रशालेतील शैक्षणिक सुविधा व शिक्षकांचे मार्गदर्शनयामुळेच हे यश प्राप्त झाल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी उपमुख्याध्यापक व्ही.एस.दराडे,उपप्राचार्य ई.जी.शिंदे, पर्यवेक्षक ए.ए.पवार, एम.ए.भोसले व सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थीतसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एम.शितोळे यांनीकेले.


















