पंढरपूर – डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेच्यावतीने तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन पणजी (गोवा ) येथील कला अकादमी येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. ह्या महाअधिवेशनाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाच्या सत्रात विविध वैचारिक विषयावर चर्चा करण्यात आली.
दरम्यान या महाअधिवेशनात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप’ या विषयावर येथील ॲड.संदिप कागदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतीय राज्य घटना, मूलभूत अधिकार, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्या वरील निर्बंध, वैयक्तिक जीवनाचा अधिकार यासह अभिव्यक्ती स्वातंत्र्य संबंधातील विविध संविधानिक बाबी याबाबतीत सखोल व अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली.
दरम्यान अँड.संदिप कागदे यांना सन्मान चिन्ह,शाल ,गुलाब पुष्प देऊन पणजीचे खासदार सदानंद शेठ तानावडे यांनी केला. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंदशेठ तानावडे, संघटनेचे अध्यक्ष राजा माने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी उपस्थित होते. ह्यावेळीसंपादक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























