पंढरपूर – तालुका पोलिसांनीतालुक्यातील पोहोरगाव व शेगाव येथे अवैध दारूसाठ्यावर कारवाई केली. या कारवाई मध्ये एकूण पंधरा हजारदोनशे रुपयांचा दारू साठा जप्त केल्याचीमाहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या कारवाई संदर्भात माहिती देताना पोलिस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले की, ९ मे २०२६ रोजी पंढरपूर तालुका पोलिसांनी आगामी यात्रा, सण आणि उत्सवच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पोहोरगाव आणि शेगाव याठिकाणी अचानक छापामारी केली. या कारवाई दरम्यान अवैध दारू साठ्यावर रेड करून एकूण पंधरा हजार दोनशे रुपयांचादेशी-विदेशी दारू साठा जप्त केलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीं बंडू यासीन सय्यद ( वय ५२, रा.पोहोरगाव ) आणि नरेश सुरेश दुध्दम(वय ४०, रा. शेगाव ) याचे विरुद्ध मुंबई दारूबंदी कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर,सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, आबासाहेब शेंडगे, पोलीस हवालदार गावडे पोलीस हवालदार सुजित उबाळे, सुभाष देशमुख, दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ यांच्या पथकाने केली.
























