बार्शी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत चाटे कोचिंग क्लासेसने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही २०२६ च्या परीक्षेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यशाचे नवीन शिखर सर केले असून २७९ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळवत ‘चाटे पॅटर्न’चा दबदबा कायम राखला आहे. चाटे क्लासेसचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून, सर्वच विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी आणि संस्कृतसारख्या कठीण विषयांत चाटेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
अभिनंदन नवले याने ९९.२०% गुण मिळवून चाटे शिक्षण समूह बार्शी शाखेत प्रथम येण्याचा मान मिळवला. अभिनंदनने आपल्या यशाचे श्रेय चाटे क्लासेसच्या अभ्यासू शिक्षकांना आणि त्यांच्या ‘परफेक्ट नोट्स’ला दिले आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल बोलताना संस्थेचे संचालक प्रा. पांडुरंग घाडगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. “विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश साध्य झाले आहे. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी हे विद्यार्थी सज्ज आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते बोलताना पुढे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, चाटे क्लासेसची ‘टेस्ट सीरिज’ आणि शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे.”
निकाल जाहीर होताच चाटे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. योग्य नियोजन आणि वेळेवर घेतलेल्या सराव परीक्षांमुळे मुख्य परीक्षेचा आत्मविश्वास वाढला, अशी भावना यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पालकांनीही आपल्या पाल्याच्या यशाचे श्रेय चाटे क्लासेसच्या शिस्तबद्ध वातावरणाला दिले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे चाटे शिक्षण समूहाच्यावतीने अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.





















