श्रीपूर – माळशिरस तालुक्याचे विद्यमान आ . उत्तमराव जानकर , माढा मतदार संघाचे आ . अभिजित पाटील व माळशिरसचे माजी आ. रामभाऊ सातपुते त्याच प्रमाणे माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज यांच्या वतीने महाळुग – श्रीपूर येथिल शेती महामळाचे जमिनीवर एमआयडीसी मंजूर व्हावी म्हणून उद्योग विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता . त्याची दखल घेत उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या आदेशा प्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सेलापूरचे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड , उपअभियंता प्रदीप खंडारे , भूमापक प्रमुख सारंग साबळे , भूमापक भारत भांजी यांच्या शिष्टमंडळाने महाळुंग , श्रीपूर , बोरगांव , मिरे या ठीकाणी प्रत्यक्ष येवून महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जागेची पाहणी केली .
याबबतचे वृत्त असे की ,
माळशिरस तालुक्याचा विचार करता अनेकदा तालुक्यात एमआयडीसी व्हावी व युवक व बेरोजगारांचे हातला काम मिळावे म्हणून
राजकीय व्यासपीठावरून विचार मांडले गेले . परंतु मोठ्या प्रमाणात लागणारी जमिन उपलब्ध होत नसलेने प्रस्तावाचा उपयोग झाला नाही . विद्यमान आ . उत्तमराव जानकर व माळशिरस चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे भानुदास सालगुडे पाटील , सोमनाथ वाघमोडे , शिवसेना शिन्दे गटाचे तालुका प्रमुख ,तानाजी भोळे – पाटील , या उद्योजक महावीर शहा , महाळूंग – श्रीपूर नगरपंचायतीचे विद्यमान सदस्य सोमनाथ मुंडफणे , तानाजी भगत यांनी महाळुंग , श्रीपूर , बोरगांव , मिरे या हद्दीत शेती महामंडळाची सुमारे ३८०० एकर क्षेत्र असल्याने या जागेचा प्राधान्याने विचार व्हावा असे सुचविले . त्या प्रमाणे मंगळवार दि . १२ मे रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाचे अधिकारी येवून त्यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली . पाहणी दरम्यान शेती महामंडळाचे लेखापाल राजेंद्र काशिद यांनी सर्व क्षेत्रांची माहिती दिली .
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे भानूदास सलगुडे – पाटील व सोमनाथ वाघमोडे यांनी महाळुंग – श्रीपूर येथिल शेती महामंडळाची जागा मोठ्या क्षेत्राचे स्वरूपात समतल असून या क्षेत्रास लागूनच ३ ते ४ किमी अंतरावर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्ग तसेच सध्या प्रस्तावित असणारा नागपूर ते गोवा हा शक्ती पीठ मार्ग जात असून ४ किमीवर भिमा नदी व बंधारा असलेने पाण्याची योग्य व्यवस्था होऊ शकते म्हणून ही जागा योग्य असल्याचे सांगितले .
औद्योगिक विकास मंडळाचे शिवाजी राठोड यांनी एमआयडीसी साठी जे निकष शासनाने लावलेले आहेत ते या जागेबाबत जुळत आहेत . आम्ही अहवाल सादर करून पुढील कार्यवाही साठी पाठवू असे सांगितले .
एकूणच जर या भागात एमआयडीसी झाली तर शेकडो हातांना काम मिळेल , रोजगार , व्यापार वाढेल व परिसराच्या विकासाला लांगला हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक सोमनाथ मुंडफणे , तानाजी भगत व उद्योजक महावीर शहा यांनी दिली .
फोटो :
औदयोगिक प्राधीकरणाचे शिवाजी राठोड यांचेशी एमआयडीसी जागेबाबत संवाद साधताना भानूदास सालगुडे – पाटील , सोमनाथ वाघमोडे , सोमनाथ मुंडफण
, तानाजी भगत व महावीर शहा .


























