पंढरपूर – भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त वर्षभर भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून याचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाईबाबांचा प्रेम वाहिनी रथ भक्तांसाठी भारत भ्रमण करत आहे. या रथयात्रेचे २१ आणि २२ मे रोजी पंढरपूरात आगमन होत असल्याची माहिती संपत वाघाटे यांनी दिली.
दरम्यान सर्वधर्म समभावाचा संदेशघेऊन निघालेला श्री सत्यसाईबाबांचा प्रेम वाहिनी रथ २१ मे रोजी पंढरपूर येथील श्री राम मंदिर, रघुकुल हाऊसिंग सोसायटी, पंढरपूर येथे सकाळी साडेसात वाजता दाखल होत असून पंढरपूर शहर तसेच तालुक्यातील मौजे होळे ,कौठाळी, शिरढोण येथेही भक्तांना दर्शनाचा लाभ घडावा यासाठी जाणार असल्याचे सांगून पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आलेले आहे.
—————
चौकट : ( नगरप्रदक्षिणा मार्गावरुन रथयात्रा जाणार )
दिनांक २२ मे २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रदक्षिणा मार्गाने हा रथ जाणार असून भगवान श्री सत्य साईबाबांच्या पादुका श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या भेटीस जाऊन श्री साई विठ्ठल निलायम,रघुकुल सोसायटी पंढरपूर येथे सांगता होऊन पुढे हा प्रेम वाहिनी रथ सातारा कडे मार्गस्थ होणार असल्याचे केंद्रप्रमुख संपत वाघाटे यांनी सांगितले.
—————
चौकट: ( रथामध्ये बाबांच्या पादुका ) भगवान श्री सत्यसाईबाबांच्या रथातसर्व धर्म समभाव हा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आली आहे. रथात बाबांच्यापादुका वस्तू व दिव्य संदेश असून दर्शनाने भक्तांना आत्मिक समाधान मिळते अशीभाविकांची श्रद्धा आहे.
——————
चौकट : ( चार यात्रांच्या काळात ओषधोपचाराची सेवा )
” मानव सेवा हीच माधव
सेवा” या बाबांच्या ब्रीद वाक्याशीनिगडीत राहून पंढरपूर येथे श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र राज्य शाखा पंढरपूर यांचे वतीने पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार वारीमध्ये हजारो भाविकांना मुंबई येथील तज्ञ डॉक्टर्स व सेवेकरी येऊन मोफतऔषधोपचार सेवा ६५ एकर, पत्राशेड, रेल्वे स्टेशन या ठिकाणी मनोभावे देत असतात.
—————–
चौकट : ( गोरगरिबांना अन्नदान उपक्रम)
या बरोबरच गोरगरीब व गरजू लोकांना वर्षभर लागणारी औषधे, गरोदर महिलांसाठी औषधे डोळ्यांचे चष्मे, ऑपरेशन,गाव तलाव खोलीकरण, रुंदीकरण करून दिले जातात. तर कोरोना काळात या संस्थेने संत तुकाराम महाराज, संत एकनाथमहाराज, संत सोपान काकामहाराज, संत निवृत्तीमहाराज या पालखीतील भक्तांना आषाढी वारीत उच्च प्रतीचे मोफत अन्नदान केले असल्याचे केंद्रप्रमुख संपत वाघाटे यांनी सांगितले.
Post Views: 12