सांगोला – पंढरपूर येथील रहिवासी आणि सांगोला माहेर असलेल्या माधवी समीर व्हटे-आहेरसिंग यांच्या वतीने येथील श्री दत्त मंदिर दिंडी सोहळ्यासाठी १० टाळ भेट देण्यात आले. माधवी व्हटे यांनी आपल्या माहेरच्या गावातील धार्मिक परंपरेला आणि भजनी मंडळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जपली आहे. सांगोला येथील प्रसिद्ध पेंटर काका व्हटे यांच्याहस्ते हे टाळ दत्त मंदिर भजनी मंडळाकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त, भजनी मंडळाचे प्रमुख आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माधवी व्हटे यांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल दत्त मंदिर दिंडी सोहळा मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.