पिलीव – केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापक संकल्पनेतून 2021 जनजिवन ही अतिशय महतकांक्षी योजना सुरु केली .या योजनेद्वारे प्रत्येक गावातील कुटुंबाला नळादवारे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याची योजना .म्हणजेच हर घर नल योजना सुरु केली .या योजनेअंतर्गत माळशिरस तालुक्यात 2021_22 ह्या वर्षी 86 कामे मंजूर करण्यात आली त्यापैकी 53 कामे पुर्ण झाली तर 33 कामे अपूर्ण आहेत. तर 2022_23 ह्यावर्षी तालुक्यात 25 कामे मंजूर झाली त्यापैकी 3 कामे पुर्ण झाली तर 22 कामे अपूर्ण आहेत. यामध्ये काही कामांची थोडीफार बिले मिळाली तर अनेक कामांची बीले अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत.बिले वेळेवर मिळत नाहीत यामुळे या कामांना खो बसला ती कामे अद्यापपर्यंत अपुर्णच आहेत. यामुळे अनेक ठेकेदारांनी वेळेवर बिले मिळतील या अपेक्षेने व्याजाने पैसे घेऊन तसेच सोने नाणे गहाण ठेवुन मोठ्या अपेक्षेने कामे पुर्ण केली माञ गेल्या चार वर्षांपासून बिले प्रलंबित राहिल्यामुळे अनेक ठेकेदारांवर अक्षरश उपासमारीची वेळ आली आहे. माळशिरस तालुक्यात जवळपास 70 कोटी पेक्षा अधिक बिले प्रलंबित आहेत.ठेकेदारांनी सतत पालकमंञी जयकुमार गोरे ,जिल्ह्य परिषद प्रवाहाकडे याबाबत लावून धरले माञ राज्य सरकारने केंद्राकडूनच बिले प्रलंबित आहेत. आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे संबंधित खात्याच्या मंञयानी सांगीतले. माञ शासनाच्या ह्या धोरणामुळे जनजिवन च्या कामे घेतलेल्या ठेकेदारांवर सध्या उपासमारीची वेळ. चौकट _ आम्ही चार वर्षापुर्वी काम केलेले आहे पण अद्यापपर्यंत बिले वेळेत न दिल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .ठेकेदार ,घनश्याम मुरकुटे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...















