पिलीव – माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथील अँड .विजय श्यामराव लेंगरे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या लीगल सेल तथा विधी व न्याय विभागाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष पदी पक्षाचे संस्थापक महादेव जानकर व राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंग आप्पा किन्नूर ,राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लेंगरे, यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या लीगल सेल तथा विधी व न्याय विभागाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाच्या नियम , अटी व ध्येय धोरणासी बांधील राहून जबाबदारी पार पाडून पक्षाच्या ध्येयधोरणाप्रती असलेली त्यांची निष्ठा ,कार्य करण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे .राष्ट्रीय समाज पक्षाचे
संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विचारसरणीचा प्रसार सर्वसामान्य माणसापासून उच्च पदावरील नागरिकापर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची अपेक्षा या नियुक्ती पत्रात अँड.विजय लेंगरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे .
आगामी निवडणुकांमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात पक्षाला यश मिळवून देत ही जबाबदारी सार्थ ठरवाल असा विश्वास पक्षाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. हे नियुक्ती पत्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते ,
प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर
सलगर,यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आले आहे .
अँड.विजय लेगरे यांच्या नियुक्तीचे राजकीय, सामाजिक व विधी व न्याय विभाग क्षेत्रा च्यावतीने स्वागत करण्यात येत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंग आप्पा ,इंदूर प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते ,मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्यकारणीचे खूप खूप धन्यवाद पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवून सर्वप्रथम पुणे जिल्हाध्यक्ष पदावरती काम करण्याची संधी दिली त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि आता प्रदेशाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर ती काम करण्याची संधी मिळाली आहे पक्षाने माझ्यावरती जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला पात्र राहून पक्षाच्या ध्येय धोरणाला धरून काम करीत राहील अशी प्रतिक्रिया अँड विजय लेंगरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
फोटो _
अँड.विजय श्यामराव लेंगरे यांना नियुक्त पत्र देताना बाळासाहेब लेंगरे, शिवलिंगआप्पा किन्नोर, ज्ञानेश्वर सलगर ,काशिनाथ शेवते ,सिदमा अककीसागर, गोविंदराम शुरनर आदी मान्यवर.
Post Views: 11