सोलापूर : नियमबाह्य बांधकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचे कठोर कारवाईचे धोरण आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईची आयुक्तांनी पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी वरील भूमिका मांडली.
आयुक्तांनी 29 नवी पेठ येथील सुरतवाला यांच्या जागेवरील तसेच शुक्रवार पेठ येथील श्री. जवाहर मोतीलाल शहा यांच्या C.S. No. 3994/क-2 या ठिकाणावरील अनधिकृत बांधकाम पाडकाम कारवाईची पाहणी केली.
यावेळी संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला तसेच अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिकेच्या धोरणानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शहरातील नियमबाह्य बांधकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
या पाहणीवेळी महापालिकेचे अधिकारी नीलकंठ मठपती व आनंद जोशी हे उपस्थित होते.
महानगरपालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी बांधकाम करताना महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेऊनच काम करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Post Views: 10