सोलापूर – सोलापूर जनता सह बँक ( मल्टी स्टेट शेड्युल) चे चीफ ऑफिसर तेलंगी पाच्छा पेठ शाखेचे शाखाधिकारी जयवंत कोकाटे यांच्या प्रदिर्घ 36 वर्ष सेवेनंतर आज रोजी शाखेत पालक संचालक पुरुषोत्तम उडता यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.त्यावेळी त्यांचे परिवार,मित्र,बँकेचे ग्राहक,कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
बँकेचे खातेदार लक्ष्मीकांत दंडी आपल्या मनोगत मध्ये कोकाटे हे प्रामाणिक,कर्तव्यनिष्ठ,वक्तशीरपणा,
बँकेचे उन्नतीसाठी अहोरात्र जटले.विशेषता त्यांनी केलेले कामाची पावती म्हणजे बँकेचे धाराशिव,लातूर शाखेचे खातेदार सेवानिवृत्ती कार्यक्रमाला हजर होते.बँकेचे काम करीत भारतीय मजदूर संघटनेचे काम,राष्ट्रीय स्वयंसेवक चे काम,तसेच किर्लोस्कर कंपनीतील मजदूरांचे पगारवाडीचे प्रश्न,बँकेतील संस्कृतिक कार्यक्रम अनेक वर्ष केले. एकंदरीत ते अष्टपैलू व्यक्ती होते.
सत्काराला उत्तर देताना बँक मुळे मी घडलो.36 वर्षाचा प्रदीर्घ सेवेत ग्राहक आपले दैवत असतो.आलेले ग्राहकाला त्याचे समाधान होईपर्यंत उत्तर द्यावे.बँकेचे डिपॉझिट व कर्ज वाढविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.
तसेच पुरुषोत्तम उडता,काकासाहेब कुलकर्णी, आकुडे मैडम,बनसोडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबात्तिनी, खुराडकर, आकूडे, चिलका, गोप मैडम यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लिंगमपेठ यांनी केली.आभार प्रदर्शन चिलका यांनी केली