
यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले की,स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती दरवर्षी २८ मे रोजी साजरी केली जाते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारी, प्रखर राष्ट्रवादी नेते, थोर साहित्यिक आणि समाजसुधारक म्हणून सावरकरांचे योगदान अतुलनीय आहे.स्वातंत्र्य वीर सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले होते. त्यांनी ‘मित्रमेळा’ आणि नंतर ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनांची स्थापना केली होती ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र उठाव केल्याबद्दल त्यांना दोन जन्मठेपेची (५० वर्षे) शिक्षा सुनावून अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आले होते. रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी जातिभेद दूर करण्यासाठी ‘पतित पावन मंदिर’ स्थापन केले आणि सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते.
हिंदुत्व विचारसरणी असल्याने हिंदुत्व’ या संकल्पनेचे त्यांनी मांडणी केली आणि भारताला एक मजबूत राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहिले. माझी जन्मठेप’, ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ आणि ‘कमला’ यांसारखी अजरामर पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांनी मराठी भाषेला(उदा. महापौर, हुतात्मा, दिग्दर्शक). अनेक नवीन शब्द दिले.
यावेळी सावरकर प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन मंगळवेढेकर, सामजिक कार्यकर्ते मालोजी शेंबडे, अक्षय देशपांडे, गुरु दोडिया, कृष्णा कवडे, गणेश शिंदे नाईक शिलरत्न झेंडे, विकी अभंगराव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————–
चौकट : (गौरव दिन म्हणून २८ मे हा दिवस साजरा )
दरम्यान सावरकर यांची जयंती हा दिवस देशभरात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारने २८ मे हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…” ही त्यांची काव्यरचना आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवते ही भावना व्यक्त केली.




















