
सोलापूर – संघ शिक्षा वर्गास व सीडबॉल कार्याशाळेस सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी भेट दिली.
दि.28.05.2026 शिक्षण प्रसारक मंडळी SPM इंग्रजी माध्यम येथे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी संघ शिक्षा वर्ग व सीडबॉल कार्यशाळेस भेट देत जयोस्तुते फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
जयोस्तुते फाउंडेशनचे 07 स्वयंसेवक ( 07 विद्यार्थीनी) यांनी 3000 सीडबॉल ( बीजगोळे) तयार केले. यामधे आंबा, करंज, चिंच, कडुनिंब, जांभूळ, पारिजातक, बहावा, बकुल ई. झाडांचे सीडबॉल (बीजगोळे) तयार केले.
यावेळी जयोस्तुते फाउंडेशन चे सर्वेसर्वा शैलेश स्वामी, प्रवीण तळे, शिरीष गोलवलकर, ज्ञानेश्वर म्याकल, राजेश वडिशेरला, गणेश जाधव, राहुल शिंदे, राहुल डांगरे, पोलीस शिपाई सुनील बोदमवाड, सेवा विभागचे प्रांत मंडळ सदस्य रविकांजी कळमकर, ज़िल्हा प्रमुख करपे, सदस्य रविप्रसाद चव्हाण, सुनिल त्रिमाल, किराम कोल्हापूर, नितीन क्षीरसागर, गणेश मदगुण्डी, महेश परांडकर, गणेश गाजूला, प्रशांत खुणे, सुरेश वर्देकर व एसपीएम शाळा व्यवस्थापन यांचे सहकार्य लाभले व एसपीएम शाळा व्यवस्थापन यांचे सहकार्य लाभले.



















