
सोलापूर – एसपीएम शाळा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन ,कंपोस्टिंग ,सीडबॉल,मैदान स्वच्छता संपन्न झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्ग हरिबाई देवकरण प्रशाला येथे चालू आहे. या वर्गात शिक्षर्थीना सकाळच्या सत्रात संघस्थाना नंतर श्रमसेवा घेण्यात येते. यात सेवा भाव जागृत करणे व राहिलेल्या खरकटं जमिनीत खोदून खत तयार करणे, भोजन मंडप मैदान परिसर स्वछता करणे, मैदान फकीने रेकांनकन आखने, वेगवेगळ्या झाडाचे बीयाने शेणखताच सीडबॉल तयार करणे व रोप लागवड करणे असे उपक्रम करून प्रशिक्षण देण्यात येते.
दि.२९ मे रोजी वृषारोपण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवा विभागचे, पं महाराष्ट्र प्रांत सेवा प्रमुख शैलेंद्रजी बोरकर, प्रांत मंडळ सदस्य रविकांजी कळमकर, परिवरण संरक्षन गतिविधी प्रांत मंडळ सदास्य प्रवीण तळे ,शिरीष गोळवलकर, राजेश वडीशेरला,शैलेश स्वामी, रुद्रप्पा बिराजदार, वैभव हेगडे, अरविंद सालक्की,ज्ञानेश्वर म्याकल, यशवंत पाथरुट, ज़िल्हा प्रमुख करपे, सदस्य रविप्रसाद चव्हाण, सुनिल त्रिमाल, किरण कोल्हापूर, नितीन क्षीरसागर, गणेश मादगुण्डी, महेश परांडकर, गणेश गाजूला, प्रशांत खुणे, सुरेश वर्देकर आणि शिक्षण प्रसारक मंडळी एसपीएम माध्यम शाळा चे ही सहकार्य लाभले.


















