पंढरपूर – केंद्र शासनाच्या सीआरओस (CRS) पोर्टल वरील तांत्रिक अडचणींमुळे जन्म व मृत्यू दाखल्यांच्या नोंदणीचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असूननागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नगरपरिषदेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागामार्फत यापूर्वी एका युजर आयडीद्वारे तीन ते चार ठिकाणी लॉगिन करून कामकाजसुरळीतपणे पार पाडले जात होते. मात्र २५ मे २०२६ पासून एका युजरवर केवळ एकदाचलॉगिन करण्याची अट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदींची प्रक्रिया संथ झालीअसून अनेक अर्ज प्रलंबित राहू लागले आहेत. सध्या शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने जन्म दाखल्यांची मागणी वाढली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना वेळेत दाखले मिळत नसल्याने पालकांची धावपळ वाढली आहे. याशिवाय वारंवार सर्व्हर डाऊन होणे, पोर्टलचा वेगअत्यंत कमी असणे तसेच काही वेळा संपूर्ण प्रणाली बंद पडणे यामुळे दैनंदिन कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होत असल्याची माहिती नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने दिली आहे.
दरम्यान या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तोडगा काढावा आणिनागरिकांना जन्म-मृत्यू दाखले सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी विक्रमशिरसट यांनी नगरपालिका मुख्याधिकारी आणि प्रांताधिकारी यांची भेट घेऊन केली आहे.
Post Views: 7