बार्शी – तालुक्यातील खडकलगाव आणि जवळच असलेल्या शेंदरी रोड शैलगाव व्हळे परिसरात २ जूनच्या मध्यरात्री अनोळखी चोरट्यांनी दोन घरे फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जयसिंग गोविंद धस (वय ४६, रा. खडकलगाव) यांनी बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खडकलगाव येथील रहिवासी जयसिंग धस हे आपल्या कुटुंबासह दोन मजली घरात राहतात. २ जून रोजी रात्री ११
मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान चोरट्याने धस यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने कपाटात ठेवलेले १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ४५ हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे डोरले, १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील फुले आणि १० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
धस यांच्या शेजारील खोलीत आढळल्याने हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. कपाट उघडून पाहिले असता सोन्याचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे दिसून आले. धस यांनी तातडीने गावच्या पोलीस पाटलांना फोन करून या घटनेची माहिती दिली.
धस यांच्या घराच्या जवळच राहणारे सचिन शिवाजी भदे (रा. शैलगाव व्हळे, ता. बार्शी) यांच्या घरातही याच रात्री १२ ते अडीच वाजेच्या दरम्यान चोरी झाली. चोरट्यांनी त्यांच्या घरातून १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरुन नेला.
Post Views: 5