सोलापूर – टीपीएल अंतर्गत समाज कल्याण लॉन टेनिस क्लब, सोलापूर येथे पार पडलेल्या दोन दिवसीय लॉन टेनिस स्पर्धेत शौर्य बेंद्रे, इलिशा खबायते, आर्या जाधव, अयान बोल्ली, आर्य पवार, साईशा पुलगम आणि आर्यन येमूल या खेळाडूंनी आपापल्या वयोगटात विजेतेपद पटकावले.
बीड, नाशिक, तुळजापूर व सोलापूर अशा विविध ठिकाणांहून आलेल्या एकूण ९१ खेळाडूंनी या स्पर्धेत अत्यंत उत्साहात सहभाग नोंदवला. समाज कल्याण लॉन टेनिस क्लब आणि गॅलेक्सी प्लाय अँड हार्डवेअर, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.प्रशिक्षक सुधीर सालगुडे आणि महेश झांबरे यांच्या आयोजनाखाली या स्पर्धा पार पडल्या. तसेच, या स्पर्धेसाठी पंच म्हणून शिवा हडपद, विजय वीरगौडा, आर्यन येमूल, आशिष हुंडेकरी, शंभूराजे पवार आणि पवन डीडवानी यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी गॅलेक्सी प्लाय अँड हार्डवेअरचे अझर गदवाल व परिवार, मुलाणी , आझम सैय्यद , संगमनाथ नागोजी आणि असीफ शेख प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सोनवणे यांनी केले.
स्पर्धेतील विविध वयोगटांमधील अंतिम विजेते व उपविजेते खेळाडू याप्रमाणे:
- वयोगट १० वर्षे:
- मुले: शौर्य बेंद्रे (विजेता) वि. वि. अमन शेख (उपविजेता) – ६/१
- मुली: इलीशा खंबायते (विजेती) वि. वि. अवनी वीर (उपविजेती) – ६/२
- वयोगट १२ वर्षे:
- मुले: अयान बोल्ली (विजेता) वि. वि. ऋषिकेश चव्हाण (उपविजेता) – ६/२
- मुली: आर्या जाधव (विजेती) वि. वि. साईशा पुलगम (उपविजेती) – ६/४
- वयोगट १४ वर्षे:
- मुले: आर्य पवार (विजेता) वि. वि. यशवंतराजे पवार (उपविजेता) – ६/३
- मुली: साईशा पुलगम (विजेती) वि. वि. अमोली बिराजदार (उपविजेती) – ६/२
- वयोगट १६ वर्षे:
- मुले: आर्यन येमूल (विजेता) वि. वि. तनुज संचेती (उपविजेता) – ६/४.
- —–==




















