
पंढरपूर – तिर्थक्षेत्र पंढरपूरात सध्या सुरु असलेल्या अधिक महिनामध्ये पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. विठुरायाच्यादर्शनासाठी अधिक महिन्या निमित्त राज्य व परराज्यातून वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत असताना शहरातीलनो-पार्किंग झोनचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा वेळीवाहतूक व्यवस्थेतील त्रुटी अधिक ठळकपणे समोर येत आहेत. नो-पार्किंग झोनमध्ये उभी राहणारी वाहने, अस्पष्ट रस्ते चिन्हे आणि गायब फलक यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील काही व्यापारी आणि परराज्यातील फिरत्या विक्रेत्यावर्गाने तर अक्षरश: फुटपाथ व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद भासत आहेत. यातच अनेक ठिकाणी प्रमुख रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी तसेचरिक्षा वाहनांची बेकायदा पार्किंग होत असून यामुळे वाहतुकीला देखीलअडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातीलवाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसप्रशासन, महसूल आणि पालिका प्रशासन विभागांनीसंयुक्तपणे कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
शहरातील विठ्ठल मंदिर प्रदक्षिणामार्ग, महाद्वार चौक, गजानन महाराज मंदिरचौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,स्टेशन रोड, नगरपरिषद इमारती समोरव्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माणहोताना दिसत आहे. या बरोबरच भाजी मंडई आणि विठ्ठलमंदिराकडे जाणारे पंढरपूर शहरातील मेन रस्ते,रस्त्यावर नो पार्किंग झोन ठिकाणीअनाधिकृत पार्किंग व व्यापारी वर्गाने फुटपाथ वर अतिक्रमण केल्यामुळे वॉकर झोन नियमांचे उल्लंघन होत आहे.
पंढरपूर शहर परिसरातील रस्त्यांवर वाहतूक नियमांनुसार आखण्यात आलेल्या पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्या अनेक ठिकाणीपूर्णपणे पुसल्या गेल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना पार्किंग आणि नो-पार्किंगक्षेत्राची स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नियमांचे उल्लंघन वाढत असल्याचेनागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय पायी चालणाऱ्या भाविक, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक कोंडी व अपघात होऊ नये म्हणून उभारण्यात आलेले वॉकर झोन फलकावर अनाधिकृत बॅनर लावण्यात आलेले आहेत. वॉकर झोन फलक अनेक ठिकाणी कमी प्रमाणात आणि अदृश्य झाले आहेत.
पंढरपूर शहराच्या मध्यभागी चौफाळा,छत्रपती शिवाजीमहाराज चौक परिसर फेरी वाले, हातगाडी गाडी, ज्यूस हात गाडे ,व्यापारीलोकांनी मोठ्या प्रमाणात फुटपात वर केलेले अतिक्रमण परिणामी भाविकभक्त पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच मार्ग काढावा लागत असून वाहतूक कोंडी,अपघाताचा धोकावाढला आहे.
नगरपरिषद आणि वाहतूक पोलिस प्रशास
नानेतातडीने पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्यांचे नूतनीकरण करावे, वॉकर झोनचे फलकगर्दीचा अनुमान लक्षात घेता संख्या वाढवून फुटपाथ वर व्यापाऱ्यांनी केलेलेअतिक्रमण काढावे. तसेच नो-पार्किंग नियमांची कठोरअंमलबजावणी करावी, पंढरपूर शहरातील मोक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलीस संख्यावाढवावी अशी स्थानिक नागरिक व भाविकानी मागणी केली आहे.
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे बहुतांशमठ, धर्मशाळा आणि मंदिरे हीप्रदक्षिणा मार्गावर असून नगर प्रदक्षिणा करण्यासाठी दररोज हजारो स्थानिक लोक तसेच भाविक या मार्गावर येत असतात. दुसरीकडेयाच मार्गावर भाविकांची चारचाकी वाहनांची भाऊगर्दी देखील दिसून येते. अनेकदा भाविक चक्क आपली वाहने या मार्गावर उभी करून निघून जातात. त्यामुळे नगरप्रदक्षिणा मार्गावर वारंवारवाहतुकीची कोंडी होताना दिसून येते. हा मार्ग भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी हा मार्ग चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात यावा अशी मागणी स्थानिक करीत आहेत.
Post Views: 6