Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

तरुण भारतbyतरुण भारत
June 8, 2026
in editor
0
सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

किनवट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) यांच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ नेते सुरेश रंगेनवार यांची नुकत्याच संपन्न झालेल्या पक्षाच्या बैठकीत निवड करण्यात आली. पक्ष संघटनेत दीर्घकाळ केलेले कार्य, ग्रामीण भागातील दांडगा जनसंपर्क तसेच प्रभावी संघटन कौशल्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. ही निवड आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, माजी आमदार सुभाष साबणे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोजेगावकर, युवा नेते सचिन नाईक, विधानसभा प्रमुख वैजनाथ करपुडे पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. सुरेश रंगेनवार यांनी यापूर्वी संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किनवट तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना ग्रामीण भागात अधिक मजबूत झाली होती. सामान्य कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवत त्यांनी पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. राजकीय क्षेत्रात शांत, संयमी आणि संघटनात्मक कामावर भर देणारे नेतृत्व म्हणून सुरेश रंगेनवार यांच्याकडे पाहिले जाते. विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेत सर्वसामान्य नागरिकांशी आपले नाते दृढ केले आहे. पक्षाच्या विचारधारेचा प्रचार आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या निवडीमुळे किनवट विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. निवडीनंतर सुरेश रंगेनवार यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार असून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Post Views: 34
Previous Post

मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये तरुणाचा नशेमुळे बळी #viral #maharashtranews #marathinews

Next Post

कालबाह्य चिवड्याने तरुणास विषबाधा; मंठ्यात संतापाची लाट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कालबाह्य चिवड्याने तरुणास विषबाधा; मंठ्यात संतापाची लाट

ताज्या बातम्या

तुफान पावसाने दिल्ली विमानतळावर तारांबळ #viral #newsupdate #news

June 8, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारात दिसली अजित दादांची झलक आरोग्य कर्मचाऱ्यांना झापले #maharashtranews

June 8, 2026

कालबाह्य चिवड्याने तरुणास विषबाधा; मंठ्यात संतापाची लाट

June 8, 2026
सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

June 8, 2026

मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये तरुणाचा नशेमुळे बळी #viral #maharashtranews #marathinews

June 8, 2026

लोकमंगल को ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न #solapurnews #marathinews

June 8, 2026

इन्कमटॅक्स मध्ये नोकरीचे आमिष दाखवत सहा जणांना सव्वा पाच लाखांचा गंडा घातला #marathinews

June 8, 2026

पावसाचे पाणी कारखान्यात पडू नये म्हणून तो पत्र्यावर चढला आणि क्षणात जीव गेला #solapurnews

June 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0899349

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697