सोलापूर – घरामध्ये मोबाईल पाहता पाहता छातीत दुखून एका 41 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोलापुरातील कुंभार गल्ली येथे आज सोमवारी दुपारी बारा वाजता घडली.
राम गणपत कोकणे ( वय 41 वर्ष , रा. कुंभार गल्ली सोलापूर ) असे त्या मयत व्यक्तीचे नाव असून ते आज सोमवारी दुपारी घरामध्ये मोबाईल बघत बसले होते . अचानक त्यांच्या छातीत दुखून ते बेशुद्ध होऊन जागेवर पडले . त्यामुळे त्यांना पुतण्या प्रशांत कोकणे याने उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दुपारी दोन वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .
Post Views: 24