
पंढरपूर – नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब आणि आरती साऊंड सिस्टिम मनमाडकर परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत मैफिलीने पंढरपूर कला रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.सुरुवातीला आदरणीय डॉ.अनिल जोशी, शुभांगी जोशी, डॉ.विनय भोपटकर, सौ.शुभांगीताई मनमाडकर,डॉ.प्रसाद कुलकर्णी, आप्पासाहेब चुंबळकर,आयोजक भगवान भाऊ मनमाडकर आणि ज्ञानेश्वर दुधाणे यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.सुरुवातीला आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम तबला वादक नयन घोष यांचे शिष्य युवा तबला वादक पवन सिडाम मुंबई यांचे स्वतंत्र एकल तबलावादन झाले,ताल तीनतालामध्ये अतिशय तयारी पूर्ण कायदे,रेले, आणि पारंपरिक बंदिशी वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध केले.त्यांना सुंदर लेहरा साथ सतीश भट यांनी केली.तर दुसऱ्या सत्रात ख्यातनाम गायक विनायक हेगडे यांनी विलंबित एकतालात राग यमन त्याला जोडून बंदिश सादर करत अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली.त्यानंतर नाट्यगीत आणि अभंग त्यामध्ये तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, आणि शेवटी अगा वैकुंठीच्या राया भैरवी ने गायनाची सांगता केली.त्यांना तितकीच सुंदर आणि समर्पकपणे तबला साथ पवन सिडाम, हार्मोनियम सतीश भट पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे स्वरसाथ सोमनाथ काशीद, गोपाळ अधटराव यांनी केली.कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन संकेत कुलकर्णी यांनी केले,कार्यक्रमाला अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे रसिक आवर्जून उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे, धनंजय मनमाडकर भगवान भाऊ मनमाडकर शुभांगीताई मनमाडकर संकेत कुलकर्णी, माऊली खरात, वैभव केंगार,आदींनी अधिक परिश्रम घेतले






















