
सोलापूर – जागतिक कराटे महासंघ व एशियन कराटे महासंघाशी संलग्न ‘जपान कराटे-डो शुडोकान’ आणि ‘भारतीय शुडोकान कराटे’ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट पदवी परीक्षेत महाराष्ट्रातील ११ प्रशिक्षकांनी घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये सोलापूरसह ठाणे, मुंबई आणि सोलापूर येथील प्रशिक्षकांचा समावेश असून, त्यांना विविध स्तरांवरील प्रतिष्ठित ‘ब्लॅक बेल्ट’ पदवी बहाल करण्यात आली. यशस्वी झालेल्या या सर्व ब्लॅक बेल्ट प्रशिक्षकांना भारतीय शुडोकान कराटेचे प्रमुख मझहर खान, महाराष्ट्र शुडोकान कराटेचे प्रमुख भीमराव बाळगे, इक्बाल शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा ॲम्युचर स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष महादेव चाकोते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, नगरसेवक सीए विनोद भोसले, ‘सिकई’चे अध्यक्ष मुकुंदराव जाधव, राज्य किकबॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष मनीष सुरवसे, शिवकुमार पाटील, माजी क्रीडाधिकारी सत्तेन जाधव, सागर कत्ते, सुरेश माळगे, सुभाष काळे आणि धनंजय धेंडे आदींसह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यशस्वी प्रशिक्षक व मिळालेली पदवी (दान): सिक्स दान : सचिन सोनकांबळे (ठाणे), फिफ्थ दान : माधुरी रमानाथन (मुंबई), फोर्थ दान : महादेव ताकतोडे (श्रीपूर, माळशिरस), सुरेश सोनवणे आणि नारायण घोडके (दोघे सोलापूर), थर्ड दान : मनोज बाळगे आणि शशिकला पोळ (दोघे सोलापूर), सेकंड दान (2nd Dan): प्रचित जोगदांडे, पौर्णिमा पुजारी, भारती चिंता आणि श्रावण वालीकर (चौघेही सोलापूर).





















