सोलापूर- जनवात्सल्य निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांची सोलापूर शहर युवक काँग्रेस पदाधिकारी यांनी भेट घेतली.खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसनी केलेल्या कामांचा आढावा सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी शिंदे साहेबांना दिला.*
*माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब म्हणाले काँग्रेस पक्ष सत्तेत नसताना विरोधकांची भूमिका अनेक आंदोलनाच्या माध्यमातून युवक काँग्रेस सोलापूरात घेत आहेत.युवक काँग्रेस भक्कमपणे लढत आहे व संघटन अधिक मजबूत करा मी तुमच्या पाठीशी आहे.असे म्हणाले.*
*यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,दक्षिण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अनंत म्हेत्रे,ॲड.शुभम माने,शहानवाज शेख,सुनिल सारंगी,विवेक इंगळे,दाऊद नदाफ,सचीन पवार,धीरज खंदारे,महेंद्र शिंदे,आकाश जांभळे,शशिकांत शेळके,यासीन शेख, प्रतीक शिंगे,अस्लम शेख,अभिजीत पवार,हणमंतु जावीर,दिनेश डोंगरे,आकाश नाईक,सोपान मिसाळ,काका ख्याडे,प्रवीण चव्हाण आदि पदाधिकारी उपस्थित होते.*
Post Views: 67