सोलापूर – अभिनव उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण व बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या मार्फत सोलापूर येथे दी. १५ जून पासून दोन दिवसीय शेतीपूरक उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी पशुपालनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय कार्यशाळेत शेतीपूरक उद्योगावर आधारित शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन तसेच इतर शेतीपूरक उद्योगावरील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेळ्यांची निवड, आजार उपचार, व्यवस्थापन,लसीकरण, चारा साठवण, पद्धत गोठा बांधणे ई. कोंबड्यांची निवड, कोंबड्यांच्या इतर जाती, आजार, लसीकरण, बाजारपेठ, दुग्ध व्यवसायामध्ये गायीची निवड, उत्पादन वाढीसाठी घ्यायची काळजी तसेच विमा, विक्री कौशल्य, उद्योजकीय व्यक्तिमत्व,सुसंवादाचे कौशल्य, प्रकल्प अहवाल, शासनाच्या विविध कर्ज योजना व अनुदान विषयक माहिती शासनाच्या सवलती इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन तज्ञानमार्फत करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेस शिक्षणा आठवी पास,वयोमर्यादा जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत आहे तसेच कार्यशाळा पूर्ण करणाऱ्यास प्रमाणपत्र मिळेल.
अधिक माहिती व प्रवेशासाठी 8263008913 या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी कृपया सोलापूर शहरातील व परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीने याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष मीनल दास, अभिनव उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण व बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.




















