सोलापूर : दुष्काळी परिस्थितीतही अत्यंत कमी पाण्याचा वापर करून तूर पिकाचे विक्रमी उत्पादन घेता येते, याचे आदर्श प्रात्यक्षिक निंबर्गी येथील प्रगतशील शेतकरी गंगाधर बिराजदार यांनी सात एकर क्षेत्रावर उभारले आहे. गोदावरी जातीच्या तुरीची ठिबक सिंचनावर लागवड करून त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पिकाचे व्यवस्थापन केले आहे. त्यांच्या शेतावर जिल्हा कृषी विभागाच्या वतीने प्रक्षेत्र भेट व शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले,
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल शास्त्री, उपविभागीय कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भोसले म्हणाले, शेतकऱ्यांनी केवळ ऊस पिकाच्या मागे न लागता ठिबक सिंचनावर तुरीसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा पर्याय स्वीकारावा. तुरीच्या योग्य व्यवस्थापनातून उसापेक्षाही अधिक आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो. कृषी विभाग वारंवार ठिबक सिंचनाचा वापर करण्याचे तसेच तुरीच्या दोन ओळींतील अंतर वाढविण्याचे आवाहन केले.
तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी बिराजदार यांनी आदर्श शेतकरी म्हणून काम करून त्यांचे अनुभव जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यां पर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन केले.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल शास्त्री यांनी पिकाची पाहणी करून एका झाडाला अंदाजे २,५०० ते २,७०० शेंगा लागल्याचे निरीक्षण नोंदविले. या पिकातून एकरी सुमारे २० क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य खजिनदार चनगोंडा हविनाळे, पोलीस पाटील राजकुमार बिराजदार, मंडळ कृषी अधिकारी किरण सावंत, सहाय्यक कृषी
अधिकारी अशोक राठोड, उमेश कोळी, रमेश फरताडे, महादेव इंगळगी, अप्पू पाटील बिराजदार, राजकुमार बालगाव, रावसाहेब आळगी, कल्याणी शिरगोंडे, इरेशा कोळी, विकास बिराजदार, चंद्रकांत बिराजदार, प्रणव बिराजदार, राहुल बिराजदार, सूर्यसेन बोरगी, कासिम शेख, सुशांत लाडे, शरणप्पा चडचणे, महेश चडचणे, शिवानंद हडपद, गौरीशंकर कुंभार, अप्पासाहेब यलगोंडे, कैलास येरडावकर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
Views: 21