सोलापूर – लग्नात मानपान केला नाही , सोने घातले नाही म्हणून व नवीन जागा खरेदी करण्यासाठी माहेरून ५२ लाख रूपये घेवून ये असे म्हणून विवाहितेस घटस्फोट देण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
श्रीनू- पती, कांचना, पुरुषोत्तम-सासरा, स्वरूप श्रीहीर चिटयाल ( रा.सोलापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत सौ. श्वेता श्रीनु सभांरभ (वय-४० वर्षे, रा- मार्केडय सोसायटी ,नवीन वांलचंद कॉलेज समोर , सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी सन २०१० ते मे २०२६ पर्यत पद्मा नगर सोलापूर या ठिकाणी नांदत असताना वरील आरोपींनी लग्नामध्ये संसारोपयोगी सामान दिले नाही, सोने पैसे दिले नाही, योग्य मानपान केला नाही म्हणून अपमानीत करुन फिर्यादीला शिवीगाळ केली .तसेच नवीन जागा खरेदी करण्यासाठी माहेरून ५२ लाख रूपये घेवून ये असे म्हणून मारहाण करून घटस्फोट देण्याची धमकी देवून शारीरीक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवालदार घोडके हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 9