सांगोला – तालुक्यातील महूद परिसरातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवदास लोखंडे, जि.प.सदस्य दादासाहेब लवटे, पं.स.सदस्य उमेश पाटील उपस्थित होते. संजय महाजन, प्रकाश नष्टे, सलीम मुलाणी, संपत आसबे, भास्कर महाजन, सुधाकर डांगे या शिक्षकांचा तसेच महूद येथील १७५ किलो वजनाची कावड खांद्यावर घेऊन अतिशय खडतर प्रवास करून केदारनाथाला जलाभिषेक घातला. या कावड भक्तांचे प्रतिनिधी बाबुराव नागणे व प्रतीक ताटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी दादासाहेब लवटे, उमेश पाटील, धनंजय नरळे, डॉ.शरद नागणे, ग्राम विकास अधिकारी जयवंत लवटे, संजय महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दिलीप नागणे, महेंद्र बाजारे, विजय खबाले, निलेश नागणे, लक्ष्मण जाधव, रमाकांत तोडकरी, गणेश लवटे, विजय मरगर, यशवंत खबाले, जयवंत लवटे, संतोष नागणे, बाबुराव नागणे, धनंजय खांडेकर, संजय धोकटे, अरुण चव्हाण, अरुण नागणे, संतोष पवार उपस्थित होते. आभार उमेश महाजन यांनी मानले.
Post Views: 14