जालना : सन 2026-27 करिता केंद्र पुरस्कृत” कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) (MCP)” या नव्या अभियानाला शासनाकडून पाच वर्षाकरिता मान्यता प्राप्त झाली आहे. अभियाना अंतर्गत 125 लाख गाठी कापसाचे उत्पादन व 550 किलो लिंट/हेक्टरी उत्पादकता साध्य करायचे आहेत.
सदर अभियानाअंतर्गत पिक प्रात्यक्षिके (सघन कापूस लागवड (HDPS), क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिके (CS), एकात्मिक पिक उत्पादन (ICM) पिक प्रात्यक्षिके), बायोचार युनिट ई. घटक राबविण्यात येणार आहे.
सन 2026-27 करिता केंद्र पुरस्कृत ” कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) (MCP)” या योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिकेसाठी (सघन कापूस लागवड (HDPS), क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिके (CS) व स्थानिक पुढाकाराच्या बाबी बायोचार युनिट, कॉटन श्रेडर या घटकाचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी महा-डीबीटी प्रणालीद्वारे online अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर पीक प्रात्यक्षिक बियाणे व स्थानिक पुढाकाराच्या बाबी बायोचार युनिट इ. घटकासाठी ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना गहीनीनाथ कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
















