सोलापूर – वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन देऊन व पाठपुरावा करूनही मंद्रूपच्या नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी त्यामध्ये भरच पडत असल्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हलगी आंदोलन करण्यात आले. यावेळी हद्दवाढ भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी सरपंच अनिता कोरे व उपसरपंच भगवान व्हनमाने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीकडून चार दिवसात मंद्रूपच्या समस्या सोडवण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले . मात्र चार दिवसात समस्या न सुटल्यास मंद्रूपच्या ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुप ठोकण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे यांनी दिला आहे .
मंद्रूप मध्ये एक महिन्यापासून बंद पाणीपुरवठा, पावसाळ्यातील चिखलमय रस्ते, गावातीव अस्वच्छता, आठवडा बाजारातील गैरसोय, विविध वित्त आयोगातील निधी खर्च व कर वसूली चौकशी , बंद दिवाबत्ती यासह विविध समस्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हलगी बजाओ आंदोलन करण्यात आले . अखिल भारतीय किसान सभेच्या आंदोलनाची दखल घेऊन सरपंच अनिता कोरे व उपसरपंच भगवान व्हनमाने यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना लेखी पत्र देऊन चार दिवसात समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी तालुका सचिव भीमाशंकर झळके, सिकंदर मकानदार , मल्लिकार्जून कांबळे, हारून मकानदार, यासीन मकानदार, पैगंबर नदाफ, मळसिध्द जाधव, राजकुमार कुमठेकर, फारूक शिकलगार, सद्दाम मकानदार, इक्बाल आवटे, मुजम्मिल शेख, श्रीशैल मुंजे व षडाक्षरी स्वामी आदी उपस्थित होते.
…
चौकट
…,
अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप ठोकणार
…
मंद्रूप मधील विविध समस्यांबाबत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आले . ग्रामपंचायत कार्यालया समोर आंदोलन करताना सरपंच व उपसरपंच यांनी चार दिवसात समस्या सोडवण्याचे लेखी पत्र दिला आहे. त्यामुळे चार दिवसात समस्या न सुटल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकणार आहे.
जावेद आवटे, तालुकाध्यक्ष , अखिल भारतीय किसान सभा ,
दक्षिण सोलापूर



















