सांगोला – जि.प.प्रा.शाळा, नाझरे (ता.सांगोला) येथे शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक व शाळा समितीने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गावातून ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढून एक आनंददायी उपक्रम राबविला. जि.प.शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे पुस्तके, फुले देऊन स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष अश्विनी रायचुरे, सदस्य सोनाली भोसरी, प्रियांका मंडले, सुरेश चौगुले, रविराज शेटे, प्रवीण पाटील, रमेश पाटील, केंद्रप्रमुख मल्लय्या मठपती, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.