सांगोला – येथे तीन वर्षे न्यायदानाचे कार्य केलेले न्या.तेजवंतसिंघ संधू यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला यांच्या शैक्षणिक साहित्य भेट उपक्रमासाठी ५ हजार १०० ची देणगी देत सामाजिक उत्तरदायित्वाचे दर्शन घडविले. त्यांच्या या उदार योगदानामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची भावना आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी व्यक्त केली. न्यायासनावरील कर्तव्य आणि समाजाप्रती असलेली संवेदना यांचा सुंदर संगम घडविणारे न्या.तेजवंतसिंघ संधू यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणेचा दीप ठरत आहे.
Post Views: 12