
सोलापूर- जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अधिक मासानिमित्त जुने विठ्ठल मंदिर जोशी गल्ली सोलापूर येथे संतसंग व नामगजर कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या पवित्र सोहळ्यास सोलापूर शहर व जिल्ह्यातील असंख्य भक्त-शिष्य, बालगोपाळ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सर्वांनी संतसंग व गणी गण गणात बोते या मंत्राचा नामगजराचा गजर घेत आध्यात्मिक आनंद अनुभवला. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी रामानंद संप्रदायाचे पश्चिम महाराष्ट्र पीठ महिला सपोर्टर सविता परांडे, जिल्हा महिला अध्यक्षा संजीवनी माने, जिल्हा तंत्रज्ञान प्रमुख सागर माने, जिल्हा देणगी प्रमुख सविताताई जाधव, जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख श्रीशाताई सगनाळे, संग्राम सेना ट्रेनर विजय गाडे ,तालुकाध्यक्ष दिगंबर अवताडे, महिला तालुकाध्यक्षा ऐश्वर्या उत्तरकर, सचिव विद्याताई शेंडगे, युवा प्रमुख विनायक कांबळे विशेष कार्यवाहक अमर दुधाळ तसेच माजी तालुकाध्यक्ष दादासाहेब नागटिळक उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, तुषार कांबळे, अर्जुन उत्तरकर, शुभम क्षीरसागर, निखिल मेटे, नरसिंग सगनाळे, रामानंद संप्रदाय सेवा समितीच्या सर्व पदाधिकारी व भक्त शिष्य परिश्रम घेतले.























