पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील 58 व्या वर्षात पदार्पण करून यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या परंपरेप्रमाणे सालाबादप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मंडळाच्या श्री गणेशाची विधिवत पूजा व आरती उपसभापती सौ मनीषा अमोल मदने पाटील, अमोल मदने पाटील, पंचायत समिती सदस्या सौ नम्रता शिवराज पुकळे व शिवराज पुकळे यांच्या हस्ते सादर करून सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास व शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला .
प्रारंभी मंडळाच्या 58 वर्षे वाटचाल व कारकिर्दीचा इतिहास व राबवत असणारे कार्यक्रम गणेश उत्सव, रक्तदान शिबिरे, वारकऱ्यांची सेवा याविषयीची सविस्तर माहिती प्रास्ताविकात मंडळाचे खेळ मास्तर माजी अध्यक्ष कदिर पठाण यांनी दिली. तर यावेळी तांदुळवाडी अपघातातील पाच व्यक्तींना जीवदान दिलेले देवदूत इरफान मुजावर यांच्या टीमचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपसभापती सौ मनीषा पाटील, माजी सरपंच अमोल मदने पाटील ,पंचायत समितीच्या सदस्या सौ नम्रता पुकळे, सौ पुनम भैस, सौ सविता पुकळे, आरिफखान पठाण अँडअजय घाटे, चेअरमन रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख, माजी चेअरमन डॉक्टर मिलिंद गुळभिले, दत्तात्रय भैस, शहराध्यक्ष कुमारसिंग भैस, संतोष पडळकर, दादासाहेब शिंगाडे ,उमेश सरवदे आप्पासाहेब लोखंडे, बंडू जाधव, आबा बनसोडे ,कुमार लोखंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मंडळ राबवीत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल सामाजिक कार्यक्रमाबद्दल मंडळाचे प्रसिद्ध प्रमुख दामोदर लोखंडे ,अमोल मदने पाटील ,आरिफखान पठाण अँड अजय घाटे ,शिवराज पुकळे सौ पुनम भैस यांनी गौरव उद्गार काढून मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रसंशा केली व मंडळास सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. चैतन्य सहकारी पतसंस्थेमार्फत तातडीचे 25 हजार रुपये पर्यंतचे विनातारण शैक्षणिक कर्ज देण्याची घोषणा संचालक अरिफखान पठाण यांनी जाहीर केली तर तांदूळवाडी अपघातातील पाच व्यक्तींना जीवदान देणाऱ्या इरफान मुजावर याला व त्या़च्या टीमला राष्ट्रपती च्या हस्ते शौर्य पदक पुरस्कार देऊन सन्मान करण्याची मागणी ॲडअजय घाटे यांनी यावेळी केली यावेळी मंडळाचे अध्यक्ष कदिर पठाण ,सचिन पुकळे अतुल भैस ,आमिन खान पठाण, सागर भैस, बाबा सय्यद शशिकांत लोखंडे ,युवराज गायकवाड, रणजीत काळे ,सुरज कस्तुरे, अरमान शेख, योगेश सुतार, दामू धायगुडे ,किसन जामदार ,दिगंबर भैस ,संतोष खेत्रे ,प्रदीप चोबे शकील शेख, जिशान शेख अमन सय्यद , अरमान, व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
फोटो
संग्राम दोस्ती मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना उपसभापती सौ मनीषा मदने पाटील, अमोल मदने पाटील सौ नम्रता पुकळे पुकळे, संग्राम पाटील, आरिफखान पठाण ,शहराध्यक्ष कुमारसिंग भैस अँडअजय घाटे, डाँ मिलिंद गुळभिले ,दत्तात्रय भैस,रामचंद्र उर्फ नानासाहेब देशमुख, संतोष पडळकर ,उमेश सरवदे ,दादासाहेब शिंगाडे, दामोदर लोखंडे ,महादेव वाघमारे.