Monday, August 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यस्तरीय महानगरपालिका विशेष शिक्षक चर्चासत्र उत्साहात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका क्षेत्रांत कार्यरत विशेष शिक्षकांच्या सेवाविषयक, प्रशासकीय तसेच संघटनात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय विशेष शिक्षक चर्चासत्र सोनी महाविद्यालय, सैफुल, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी श्री दळवी सर (विशेष शिक्षक, पुणे महानगरपालिका) हे होते. कार्यक्रमास राज्यभरातील विविध महानगरपालिका क्षेत्रांत कार्यरत विशेष शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
चर्चासत्रामध्ये विविध महानगरपालिकांमधील विशेष शिक्षकांनी आपल्या सेवेशी संबंधित अडीअडचणी, भविष्यकालीन नियोजन तसेच नियमित व वेळेवर वेतन मिळण्याबाबतच्या समस्या मांडल्या. शासनामार्फत विशेष शिक्षकांच्या वेतनाचा १०० टक्के निधी वेळेत उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
तसेच महानगरपालिका स्तरावर विशेष शिक्षकांच्या पदनिर्मितीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी उपस्थित शिक्षकांनी केली. विविध महानगरपालिकांमधील विशेष शिक्षकांना भेडसावणारी एक समान समस्या म्हणजे वेतन वितरणातील विलंब असल्याचे नमूद करून त्यावर राज्यस्तरावर प्रभावी तोडगा काढण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
बैठकीत दि. ८ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषद व समग्र शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत विशेष शिक्षक नियमित सेवेत समाविष्ट झाल्यानंतर राज्यस्तरावर स्वतंत्र विशेष शिक्षक संवर्ग निर्माण करणे, तसेच सर्व विशेष शिक्षकांसाठी सेवा अटी, नियम व सुविधांमध्ये एकसमानता असावी, अशी मागणी एकमुखाने करण्यात आली. यासंदर्भातील पाठपुरावा शासन स्तरावर करण्याची विनंती उपस्थित शिक्षकांनी राज्याध्यक्षांकडे केली.
यावेळी विशेष शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री विजय देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विशेष शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून महानगरपालिका अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांना अनुकूल होईल अशा पद्धतीने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अविनाश शिंदे (सोलापूर महानगरपालिका) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री सचिन जाधवर (सोलापूर महानगरपालिका) यांनी केले.
या प्रसंगी संघटनेच्या कोषाध्यक्षा श्रीमती रश्मी परदेशी, श्री किशोर वैरागकर, श्री विठ्ठल वाघ, श्री शरद गावडे, श्री दत्तात्रय सोनवणे, श्री बालाजी थिटे तसेच सोलापूर महानगरपालिकेतील सर्व विशेष शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाबद्दल राज्याध्यक्ष श्री विजय देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिकेतील विशेष शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
“एकजुटीतून बळ, संघटनेतून हक्क” या घोषवाक्याला साजेशा वातावरणात संपन्न झालेल्या या चर्चासत्रातून विशेष शिक्षकांच्या प्रश्नांबाबत राज्यस्तरीय पातळीवर एकत्रित भूमिका मांडण्यास बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Post Views: 258
Previous Post

संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Next Post

वारीपूर्व नियोजनाला वेग; जि.प.ची सभा पंढरपुरात घेण्याचा प्रस्ताव अध्यक्षांच्या टेबलावर  

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वारीपूर्व नियोजनाला वेग; जि.प.ची सभा पंढरपुरात घेण्याचा प्रस्ताव अध्यक्षांच्या टेबलावर  

ताज्या बातम्या

द्वारकाधीश मंदिरात कृष्णाला वाहिले २७ किलो ड्रायफ्रूट आणि बनवला झोपाळा

August 17, 2026

टवटवीत फुलांनी सजली श्री सिद्धेश्वर मंदिर योग समाधी #news #solapurnews

August 17, 2026

केक खाऊन झाली ११ जणांना विषबाधा #viral #news #marathinews #latestnews

August 17, 2026

युजीसी नेटच्या तीन पेपरची सप्टेंबरमध्ये पुनर्परीक्षा #viral #news #marathinews

August 17, 2026

नाशिकच्या इगतपुरी मध्ये आईडिलांनीच मुलीची केली हत्या #viral #news

August 17, 2026

आम्हाला आमचा रस्ता परत द्या… #news #viral #solapurnews #latestnews

August 17, 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

August 16, 2026
श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

August 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1077310

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!