Tuesday, September 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शी शहर व तालुक्यात विकासाची घोडदौड दुपटीने चालू राहणार आमदार राजेंद्र राऊत 

तरुण भारतbyतरुण भारत
June 26, 2026
in west maharashtra
0
बार्शी शहर व तालुक्यात विकासाची घोडदौड दुपटीने चालू राहणार आमदार राजेंद्र राऊत 
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – शहर व तालुक्यात बाजार समिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका नगरपालिका तसेच विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयी झाल्याबद्दल व सत्ता केंद्र ताब्यात दिल्याबद्दल बार्शी शहर व तालुक्यातील मतदारांचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर प्रत्यक्ष भेट देणार असून त्यांच्या अडीअडचणी तसेच बाजार समिती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व विधान परिषद निवडणुकीत सत्ता केंद्र ताब्यात मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यासाठी शहर व तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहे.
बार्शी तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाला. तसेच विधान परिषदेचे निवडणुकीतही मला विजय करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. मी आमदार नसल्यामुळे लोकांना विकासकामांविषयी कुठेतरी दुर्लक्ष होईल असे वाटत होते. परंतु श्री भगवंत व आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज आमदार झालो. बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाणी देण्याचा शब्द दिला होता. पण कुर्डूवाडी ते पिंपळनेर दरम्यान नवीन पाईप लाईन रोडच्या मध्ये येत असल्यामुळे त्याचे काम होऊ शकले नाही. परंतु तुम्ही तशीच पाईपलाईन करा म्हणत असाल तर उद्याच करायला सुरुवात करण्यात येईल. परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या अडचणीमुळे ते काम शक्य होणार नाही व आपले पैसे फुकट वाया जातील. अक्कलकोट येथे रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटलो असता  त्यांनी मला या मार्गाची लवकरच विस्तारीकरण काम करणार असा शब्द देऊन राजाभाऊ काळजी करु नका कुठल्याही परिस्थितीमध्ये मी बाराशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी उपलब्ध करुन देतो आणि भूसंपादनला २५० कोटी आणि साडेनऊ कोटी रस्त्याच्या कामाला त्यामुळे त्याचीही मंजुरी एक महिन्यामध्ये दिल्लीला जाऊन आणतोय आणि कुर्डूवाडी ते पिंपळनेर या ठिकाणी भूसंपादन करुन कामाला सुरुवात होईल. नगरपालिका निवडणुकीत आम्ही तुम्हाला पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असा शब्द दिला होता त्याबद्दल मी आपली माफी मागतो. तांत्रिक अडचण आल्यामुळे आम्हाला एक वर्षभर आणखीन मुदत द्या, नवीन पाईप लाईन झाल्यावर आपल्याला कायमस्वरुपी रोज पाणी मिळणार आहे. आता आपण पाहतोय की पाण्याची अडचण किती आहे आपण नियोजन करताना साधारण पुढच्या ३०-३५  वर्षांचा विचार केलेला आहे. त्यामुळे कोणी गैरसमज करुन घेऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्याकडून विकास कामाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये निधी मंजूर होणार आहे. पत्रकार परिषद घेऊन सगळ्या जनतेच्या समोर ही माहिती दिली जाईल. शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त पिकविमा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून व जिल्हा दूध संघ सुद्धा कसा चालू करता येईल याबाबतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर चर्चा करुन त्याबाबतचा पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानतो व निकाल लागला आमदार झालो की अधिवेशन चालू झाले. सगळ्यांना असं वाटू नये आमचा राजाभाऊ कुठे गेला. साडेतीन महिन्यांपूर्वी श्री तिरुपती दर्शनासाठी बुकिंग केली होते. तिरुपतीला चाललोय नंतर अधिवेशनच आहे तर माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे या अधिवेशन झाल्यानंतर मी सगळ्या ग्रामीण भागाचा व शहरात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व बाजार समितीमध्ये सत्ता आल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानण्याकरता सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन दौरा करणार आहे. शासकीय बाजार समिती  येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले, बाजार समितीचे चेअरमन विजय गरड, पंचायत समिती सभापती मीनाक्षीताई रोंगे आदी उपस्थित होते. बार्शी शहर व तालुक्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यासाठी गर्दी झाली होती  यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, बाजार समिती संचालक आदींसह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 76
Previous Post

उत्पात मंडळींच्या सेवा हक्कांचे प्रकरण, जिल्हा न्यायालयाच्या ‘रिमांड’ आदेशाला अंतरिम स्थगिती

Next Post

राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श घ्यावा – मल्लिनाथ कल्याणशेट्टी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श घ्यावा – मल्लिनाथ कल्याणशेट्टी

राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श घ्यावा - मल्लिनाथ कल्याणशेट्टी

ताज्या बातम्या

दोन मुख्य जलवाहिन्या फुटल्या; शहराचे पाणी रोटेशन पाच दिवसआड़ #viral #news #solapurnews #latestnews

September 28, 2026
हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

September 28, 2026

सांगोला विद्यामंदिरमध्ये आज संत विचारांचा महाजागर

September 28, 2026

पैशांच्या व्यवहारातून सोलापूरजवळील कुंभारीत ५४ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने हत्या

September 28, 2026
अक्कलकोट प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश; ६७ वी वार्षिक सभा उत्साहात

अक्कलकोट प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश; ६७ वी वार्षिक सभा उत्साहात

September 28, 2026
भावी अभियंत्यांना यशाची नवी दिशा; सिंहगडमध्ये दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहात

भावी अभियंत्यांना यशाची नवी दिशा; सिंहगडमध्ये दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहात

September 28, 2026
स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची FRP-MSP लिंक करण्याची आणि ऊस उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची FRP-MSP लिंक करण्याची आणि ऊस उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

September 28, 2026
कायदेविषयक व्याख्यानातून विद्यार्थिनींना कायद्याचे मार्गदर्शन

कायदेविषयक व्याख्यानातून विद्यार्थिनींना कायद्याचे मार्गदर्शन

September 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1273120

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!