सोलापूर – पिकप वाहन पलटी झाल्याने मध्य प्रदेश येथे राहणारे सात बांधकाम मजूर जखमी झाल्याची घटना सोलापूर मोहोळ मार्गावर कोळेगाव जवळ आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली .
लाल रूप सिंग डावर (वय 18 वर्षे ) , विक्रम रमेश मानकर (वय 17 ) ,कमल सुरूपाल ठाकूर ( वय 23 ) ,संजय सुमरिया सोलंकी ( वय 22 ) सावन सुमरिया सोलंकी ( वय 23 )अजय जयराम वासकेले ( वय 23) आणि देवा पप्पू चव्हाण ( वय 13 वर्ष , सर्व रा . मध्य प्रदेश ) अशी जखमींची नावे असून ते सर्व आज सोमवारी सकाळी मोहोळ कडून सोलापूर कडे महिंद्रा पिकप मधून सोबत स्लॅब घालण्याची मिक्सर येऊन निघाले असताना वाटेत कोळेगावच्या उतारावर पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने मिक्सर मशीन ला कट मारला . त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकप पलटी झाली .यात वरील सर्वजण मुकामार लागून जखमी झाल्याने त्या सर्वांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून येथील शासकीय रुग्णालयात दुपारी साडेबारा वाजता दाखल करण्यात
आले .
Post Views: 11