सोलापूर – दि.२९/६/२०२६ नामजप हे भगवंतप्राप्ती साठी सुलभ मार्ग असून लिखित नामजप हे भक्तिमार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे म्हणून श्री स्वामी समर्थ शतकोटी लिखित नामजप यज्ञात सामील होऊन सद्गुरूंच्या चरणी लीन होऊया असे आवाहन अखंड नाम जप लिखित समितीचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज)यांनी अशोक चौक येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात लिखित नामजप वह्यांचे वितरण सोहळा प्रसंगी उपस्थित स्वामी भक्तांना केले
अखंड लिखित नामजप समितीच्या वतीने अशोक चौक येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात लिखित नामजप वह्यांचे वितरण मंदिराचे पुजारी श्री आप्पासाहेब बाबर यांच्या उपस्थितीत श्री स्वामी सेवक विष्णू कारमपुरी(महाराज) यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी श्री स्वामी समर्थांचे महापूजा महाआरती व पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर लिखित नामजपाचे महत्त्व आणि संकल्पना याबाबत माहिती देण्यात आले यावेळी सुमारे 250 स्वामीभक्त बंधू-भगिनींनी लिखित वह्या घेतल्या
सदर प्रसंगी रोहिणी बंद पट्टे श्रीधर द्यावरकोंडा, शकुंतला केशरबावी,राजेश्वरी तिरंदास, वृंदा बोध्दूल,शुभम कारमपुरी,भारत देवकुळे, निरंजन बोध्दूल,मोहन उदगिरी,विकास गुंटूक यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते
Post Views: 37