कुर्डुवाडी – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कुर्डुवाडी शहराध्यक्षपदी श्री. सोमनाथ अजगरे (माळी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी नियुक्तीपत्राद्वारे जाहीर केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाच्या विचारधारेनुसार कुर्डुवाडी शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच पक्षवाढीसाठी जोमाने काम करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर सोमनाथ अजगरे (माळी) यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, कुर्डुवाडी शहरातील युवकांना पक्षाशी जोडून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी दर्शन काशीद, सागर गायकवाड, सुरज गायकवाड, विश्वसिंह भोसले, अर्शद मुलाणी, विनोद घाडगे, रोहित परबत, नागन्नाथ पवार, रावसाहेब मुसळे, अस्लम शेख, बंडू टोणपे, सुमित काशीद, यशवंत साळवे, प्रवीण गायकवाड, विजू जानराव, सचिन तावडे, राजेंद्र कांबळे, साहिल बागवान, दिनेश माळी, जब्बार बागवान व दत्तात्रय माळी यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नियुक्तीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोमनाथ अजगरे (माळी) यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 9