पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मिडीयम शाळेतील पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्गखोल्यांचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर नव्याने सजलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
लहानग्या विद्यार्थ्यांना आनंददायी, सुरक्षित आणि आधुनिक शिक्षणाचे वातावरण मिळावे या उद्देशाने शाळेतील सर्व वर्गखोल्यांचे आकर्षक स्वरूपात नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये रंगीबेरंगी व आकर्षक बेंच, सुंदर रंगरंगोटी केलेल्या भिंती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक असे शैक्षणिक वातावरण तसेच अध्यापन अधिक प्रभावी आणि रंजक करण्यासाठी स्मार्ट इंटरॅक्टिव्ह टीव्हीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, त्यांच्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक आनंददायी आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
याप्रसंगी श्राविका संस्थेचे सचिव श्री.यतिनजी शहा सर तसेच संस्थेचे विश्वस्त श्री.करण शहा सर व प्रशासकीय अधिकारी कुमारी देवई शहा मॅडम, मुख्याध्यापिका सौ.स्वाती कांबळे ,शाळेच्या समन्वयिका सौ.अर्चना अक्कलकोटे व पर्यवेक्षिका सौ.कल्पना रामावत,श्री स्वप्नील कोठारी , संस्थेच्या सर्व विभागातील विभाग प्रमुख, शिक्षकवृंद, पालक तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार, आधुनिक आणि संस्कारमूल्यांनी समृद्ध शिक्षण देण्याचा आमचा संकल्प यापुढेही अधिक दृढपणे सुरू राहील.
Post Views: 35