Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शालेय वयातच संशोधक वृत्ती जोपासा, प्रत्येक विद्यार्थ्याला ‘पेटंट’ मिळवण्याची मोठी संधी-डॉ.अशोक नगरकर

तरुण भारतbyतरुण भारत
July 4, 2026
in west maharashtra
0
शालेय वयातच संशोधक वृत्ती जोपासा, प्रत्येक विद्यार्थ्याला ‘पेटंट’ मिळवण्याची मोठी संधी-डॉ.अशोक नगरकर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगोला –  आजचे युग हे विज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञानाचे युग असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ दुसऱ्यांनी निर्माण केलेले तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा स्वतः नवनवीन शोध लावणे ही काळाची गरज बनली आहे. याच प्रगल्भ विचारांची रुजवणूक शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये व्हावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपले संशोधन ‘पेटंट’ करण्याची मोठी संधी ओळखावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे समवेत संशोधन कार्य केलेले डॉ.अशोक नगरकर यांनी केले. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगोला येथील विद्यामंदिर प्रशाला व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संशोधन आणि पेटंट याचे विद्यार्थी दशेतील महत्त्व’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतगुणकी, हाऊ टू स्टडीचे सचिन भालशंकर, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदिप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत रायचुरे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.नगरकर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्यासोबतच्या अनेक प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. स्वतःच्या मुलीचे संशोधन सांगत १० लाख लोकांमागे केवळ ४ शास्त्रज्ञ आहेत तर प्रगत देशांत हे प्रमाण ४०० इतके मोठे आहे. योग्य दिशा मिळाल्यास आपल्याकडील ९५% विद्यार्थी शास्त्रज्ञ होऊ शकतात, असा सार्थ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी या व्याख्यानामागील उदात्त भूमिका स्पष्ट करत, विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची चमक निर्माण व्हावी आणि उत्तम शास्त्रज्ञ घडावेत याच प्रामाणिक हेतूने हे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चारुदत्त जगताप, सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण व उन्मेश आटपाडीकर यांनी केले. आभार प्रशांत रायचुरे यांनी मानले.
चौकट-
काशीनाथ भतगुणकी यांनी सायकलवरून थेट दिल्लीला जाऊन डॉ.कलाम यांना भेटल्याचा स्वतःचा प्रसंग सांगितला. ग्रामीण भागात प्रचंड गुणवत्ता दडलेली असून ३००० पेक्षा अधिक करिअर क्षेत्रे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करावे आणि संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रशालेतील किमान ७५ विद्यार्थ्यांनी भविष्यात अधिकारी, शास्त्रज्ञ बनून कृषी व संरक्षण क्षेत्रात आपली स्वप्ने साकार करावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Post Views: 9
Previous Post

बुरुड गल्ली, गडशी गल्लीतील पाणी प्रश्न मार्गी

Next Post

वनीकरणातील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे वर्ग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वनीकरणातील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे वर्ग

ताज्या बातम्या

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0958126

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!