बार्शी – मुंबई येथील मंत्रालयात आमदार राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन बार्शी तालुक्यातील बार्शी, पांगरी आणि वैराग येथील शासकीय रुग्णालयांच्या विविध प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगीआमदार राजेंद्र राऊत यांनी पुढील महत्त्वाच्या मागण्या मंत्री महोदयांकडे मांडल्या. बार्शी शहरातील गाडेगाव रस्ता येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी.
पांगरी येथील प्रस्तावित ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा.
वैराग येथील प्रस्तावित ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी संबंधित कामांवर लवकरच आवश्यक कार्यवाही करुन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत यांना दिले.
बार्शी तालुक्यातील नागरिकांना अधिक सक्षम, आधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु आहे.
Post Views: 7