सहकार सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक ३ जुलै २०२६ रोजी आर्यनंदी पतसंस्थेच्या वतीने कर्ज वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. बाहुबली दुरूगकर, अधिकारी, संचालक, कर्मचारी, सभासद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या शिबिरामध्ये पात्र सभासदांना डॉ. राजेश फडकुले(संस्थापक, अध्यक्ष – आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर), डॉ. शिल्पा फडकुले(आर्यनंदी पतसंस्थेच्या सल्लागार सदस्य व आर्यनंदी निधी लि. च्या संचालिका), श्री. बाहुबली दुरूगकर(उपाध्यक्ष, आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर), प्रा. श्री. निलेश एखंडे (संचालक, आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर) व श्री. वैभव आहेरकर(मुख्य कार्यकारी अधिकारी, आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर) यांच्या हस्ते विविध कर्जांचे फॉर्म वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. वैभव आहेरकर तसेच आभार प्रदर्शन प्रा. श्री. निलेश एखंडे यांनी केले. या कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभासदांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पतसंस्थेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतला. भविष्यातही सभासदांच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.




















