पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढी यांच्या वतीने शालेय वस्तू वितरण सोहळा राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील सुमारे ३० शाळांमधील १५०० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अशोकराव भारत ताजने हे उपस्थित होते. सुरुवातीला पतपेढीचे अध्यक्ष ॲड. अर्जुन खुर्पे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे व नागरिकांचे स्वागत केले. या सोहळ्याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राम भुजबळ, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद सातव, ॲड. प्रशांत यादव, शशीधर पुरम, यश कपूर, आरती संघवी, वृंदा शाह, शाम सहाणी, इमादभाई सय्यद, कीर्ती शाह, योगेश खुर्पे, शेली जमशेद बॅनर्जी, विजय मेहता आणि ॲड. एम. के. वाडकर यांसह अनेक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमा भूषण आलात यांनी केले. वनिता विशाल खुर्पे यांनी आभार मानले.
——–
डॉक्टर झाल्याबद्दल विशेष सत्कार
याच सोहळ्यात घोरपडी व्हीलेज हायस्कूलच्या शिक्षिका राजश्री माणिक रसाळ यांची कन्या श्रेया माणिक रसाळ हिने एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर पदवी संपादन केल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
——–
गुणवंत शाळांचा गौरव व सत्कार: इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल लावल्याबद्दल आणि आदर्श कामगिरी केल्याबद्दल विविध शाळांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्या शाळा : सायरस पूनावाला कॅम्प एज्युकेशन हायस्कूल, सेंट जॉन्स सेकेंडरी स्कूल, विलू पूनावाला कॅम्प एज्युकेशन सेकेंडरी स्कूल, सेंट अँड्र्यूज गर्ल्स हायस्कूल.



















