सोलापूर : क्रिकेट खेळताना बॉल लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना गंगा नगर भागात ५ जुलै २०२६ रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली . दरम्यान याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी काजल सर्वगोड, लक्ष्मी गायकवाड, गोविंद गायकवाड, अतिश गायकवाड, सतिश गायकवाड, विरेन सर्वगोड, काजलचा पती, ऐश्वर्या सर्वगोड आणि बेबी सर्वगोड (सर्व रा. हब्बू वस्ती, सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत नूतन पोपट निकंबे यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी नूतन निकंबे यांच्या घरासमोर त्यांचा मुलगा प्रेम आणि त्याचे मित्र क्रिकेट खेळत होते. यावेळी खेळताना बॉल आरोपी काजल सर्वगोड हिच्या मुलीला लागला. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. “तुम्हाला मस्ती आली आहे, तुम्हाला इथे राहू देणार नाही,” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी, त्यांची बहीण आणि आई यांना हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बाबर करत आहेत.
Post Views: 12