अक्कलकोट – जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा, बोरोटी खुर्द येथे शाळा समृद्धी उपक्रमांतर्गत लोकसहभागातून प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. गावचे सरपंच हुसेनी नंदिवाले यांनी विद्यार्थ्यांना सुमारे ₹7,500 किमतीचे शैक्षणिक साहित्य भेट देत शिक्षणाला मोलाची साथ दिली. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, कंपास, रबर, पाट्या तसेच विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्रे (आयडेंटिटी कार्ड) यांचे वाटप करण्यात आले.
याच कार्यक्रमात गावचे नागरिक पांडुरंग कोळी यांनी शाळेच्या सौंदर्यीकरण व पर्यावरण संवर्धनासाठी सुमारे ₹5,000 किमतीच्या 20 कुंड्या आणि विविध प्रकारची शोभिवंत व फळझाडांची रोपे शाळेला भेट दिली. या उपक्रमामुळे शाळेचा परिसर अधिक हिरवागार व आकर्षक होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन केंद्रप्रमुख करुणा गुरव उपस्थित होत्या. व्यासपीठावर तुकाराम कोळी, सादिक जमादार, गोपाल लोहार, राजू हालोळ्ळी, माजी केंद्रप्रमुख श्रीमंत पुजारी, भीमा कडबे,प्रशांत पाटील,आकाश शिंगे,निलेश शिंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक शरणप्पा फुलारी यांच्या पुढाकारातून मागील आठ ते नऊ महिन्यांपासून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या कार्यात मुख्याध्यापिका राजश्री तांबे, विषय शिक्षक अनंत बांगर व अंजली वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच परिसर सुशोभीकरण, वृक्षारोपण, विद्यार्थी विकास आणि समाजसहभाग वाढविण्यासाठी शाळेचे प्रयत्न परिसरात कौतुकास्पद ठरत आहेत.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शरणप्पा फुलारी यांनी केले, तर अनंत बांगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो ओळ :-
बोरोटी (खु) जिल्हा परिषद कन्नड शाळेत लोकसहभागातून शाळा समृद्धी उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य व वृक्षसंपदेचे भेट देताना सरपंच हुसेनी नंदिवाले,पांडुरंग कोळी,नूतन केंद्र प्रमुख करुणा गुरव,सादिक जमादार,तुकाराम कोळी,गोपाल लोहार,राजू हालोळ्ळी,श्रीमंत पुजारी,भीमा कडबे,प्रशांत पाटील, आकाश शिंगे,निलेश शिंगे ,राजश्री तांबे, शरणप्पा फुलारी, अनंत बांगर,अंजली वाघमारे आदी दिसत आहे.
Post Views: 6