अक्कलकोट – दुधनी मार्केट कमिटीचे संस्थापक अध्यक्ष स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या नियोजित पुतळ्यासंदर्भातील वाद प्रकरण दुर्दैवी आहे.त्यांच्यामुळे आम्हा व्यापारी व शेतकऱ्यांचे हित साधले आहे.आणि म्हणुनच स्व. सातलिंगप्पांच्या सन्मानार्थ आम्ही व्यापारी असोसिएशनने विचारविनिमय करुन घेतलेल्या निर्णयानुसार पाच दिवस सर्व प्रकारचे सौदे बंद केले होते.पण माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी आम्हाला बोलावुन शेतकऱ्यांच्यादृष्टीने हितकारक नसुन आपण सर्वांनी माघार घ्यावी,असे आवाहन केल्यानंतर सोमवारपासुन सौदे पुर्ववत होणार असल्याची भुमिका व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजशेखर दोशी यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना जोशी म्हणाले की,शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे या उद्देशाने स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी दुरदृष्टीने दुधनीत मार्केट कमिटीची स्थापना केली.यामुळे हजारो लोकांना फायदा झाला आहे.मार्केट कमिटीत अशा लोकनेत्यांच्या नियोजित पुतळ्यासंदर्भात सुरु असलेला वाद दुर्दैवी आहे.म्हणुनच आम्ही सौदे बंद केले होते.पण ही गोष्ट कळताच माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रेंनी आमची समजुत काढली.शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान हिताचे नाही, असे त्यांनी सांगताच आम्ही सोमवारपासुन सौदे पुर्ववत करत आहोत असे सांगितले.
यावेळी व्यापारी गुरुशांत परमशेट्टी,अशोक पादी, गुरुशांत माड्याळ, जगदीश माशाळ, चंद्रकांत भत्ता,गुरुप्रसाद परमशेट्टी,संजयकुमार नुल्ला,सातलिंग गौडगांव, प्रशांत पादी, नरेश इरकट, राघवेंद्र रजपुत यांच्यासह इतर व्यापारी उपस्थित होते.